भंडारा दर्पण/प्रतिनिधी
भंडारा : भारत मुक्ति मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांति मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा तर्फे बुधवारी (९ एप्रिल) विविध मागण्या घेऊन राष्ट्रीय किसान मोर्चा अध्यक्ष अभय रंगारी यांच्या नेतृत्वात जेल भरो आंदोलन करण्यात आले.
ओबीसी जाती जनगणना, महापुरुषांचा अपमान, शेतमालाला हमीभाव, शेतकरी हक्क मूल्य व भावांतर मूल्य, इव्हिएम विरोधात जेलभरो आंदोलन करण्यात आले. तसेच याच आंदोलनाचा एक भाग म्हणुन १ जुलै २०२५ रोजी भारत बंद चे आयोजन करण्यात आले आहे.
सोयाबीन, कापूस यांसह खरीप व रब्बी हंगामातील सर्व प्रकारच्या शेतमाल खरेदीसाठी कायम स्वरूपी शासकीय हमीभाव खरेदी केंद्रे सुरू ठेवण्यात यावे, महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील शिफारशीत हमीभाव व केंद्र सरकार मार्फत घोषित हमीभाव यातील फरकाची रक्कम अर्थात “शेतकरी हक्क मूल्य” तसेच केंद्र सरकार मार्फत घोषित हमीभाव व कृषी उत्पन्न बाजार समित्या मधे प्रत्यक्ष मिळणारा भाव यातील फरकाची रक्कम अर्थात “भावातर मूल्य” प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात यावे यासह शेतकऱ्यांच्या हिताच्या इतरही मागण्यांना घेवुन हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.













