भंडारा दर्पण/प्रतिनिधी
आमगाव (दि.) : राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती हनुमान मंदिर आमगांव (दि.) येथे शुक्रवारी (11 एप्रिल) उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प.चक्रधर रेहपाडे महाराज तर प्रमुख पाहुणे सुनिता रामलाल चौधरी, उपसरपंच लक्ष्मण गायधने, ग्राम पंचायत सदस्य आनंदकर सार्वे, वनिताताई शिंगनजुडे, तरारे, गोपाल चौधरी, दिलीप भांडारकर, राजू बोन्द्रे, देवानंद चौधरी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ओबीसी सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.













