भंडारा दर्पण/प्रतिनिधी
लाखनी: हनुमान जयंतीचे औचित्य साधुन लाखनी तालुक्यातील मानेगाव /बेळा येथे शनिवारी (12 एप्रिल) रक्तदान शिबिराचे आयोजन हनुमान मंदिरात करण्यात आले. या शिबिरात 13 रक्तदात्यांनी रक्तदान करून हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा केला.
रक्तदात्यांमध्ये उमेश गायधनी, नितीन कानोजकर, विपीन खवास, उमेश (बापू) गायधने, देवेंद्र पाखमोडे, दिपक पुरुषोत्तम पाखमोडे, क्रिष्णा गायधने, शरद खराबे, ज्ञानेश्वर हटवार, सचिन पाखमोडे, गिरीधर पाखमोडे, दानेंद्र निखाडे, स्वप्नील भोरे यांचा समावेश आहे.तर रक्त संकलन शासकीय रक्तपेढी भंडारा यांनी केले. यावेळी डॉ मीरा सोनवणे, तंत्रज्ञ सना शेख, राहुल गिरी, लोकेश गोटेफोडे उपस्थित होते.
