भंडारा दर्पण/प्रतिनिधी
भंडारा : शहरातील अण्णा भाऊ साठे चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अण्णा भाऊ साठे सामाजिक संस्थेच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
शिक्षण, समता आणि स्वबळावर आधारित बाबासाहेबांचे विचार आजही नव्या पिढ्यांना प्रेरणा देतात आणि न्यायपूर्ण समाजाच्या दिशेने मार्गदर्शन करतात. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या जीवनावर विचार व्यक्त केले.
यावेळी प्रमुख अतिथी कॉ. हिवराज उईके, मते, गणेश ढोके, ईश्वर कांबळे, राहुल लोखंडे, कृष्णा खडसे, बिसेन, शेखर खडसे, राजेश खडसे, सुमित जाधव, किशोर खंडाळे, रवि जाधव, जैराम बावणे तसेच नागरिक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व प्रस्तावना मते यांनी तर आभार गणेश ढोके यांनी मानले.













