भंडारा दर्पण/प्रतिनिधी
भंडारा : महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात बचतगटाच्या माध्यमातून स्वावलंबी करण्याबरोबर आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक जीवन जगण्यासाठी विशेष महत्त्व दिले जात आहे. त्याकरिता आपल्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी महिलांनी स्वाभिमानी जिवन जगावे असे प्रतिपादन सहाय्यक धर्मादाय आयुक्त निलिमा मालोदे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवस आराखडा कार्यक्रमांतर्गत गरीब व गरजू महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम न्यास कार्यालय भंडारा यांच्या मार्गदर्शनात शितला माता देवस्थान, तुळजाभवानी देवस्थान, अंबाई- निंबाई देवस्थान व अन्नपूर्णा देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाचा 500 च्या वर महिलांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक धर्मादाय आयुक्त निलिमा मालोदे तर प्रमुख पाहुणे म्हणून अधिक्षक छाया भुसारी, निरीक्षक कीर्ती दुरुगकर, शितला माता मंदिराचे अध्यक्ष ईश्वरलाल काबरा, धनराज धुर्वे मंगला कोल्हे, विलास केजरकर, किशोर वाघमारे तसेच चारही देवस्थानाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.













