भंडारा दर्पण/प्रतिनिधी
भंडारा : महिला शिक्षण प्रसारक मंडळ भंडारा द्वारा संचालित महिला अध्यापक महाविद्यालयात जागतिक मौखिक आरोग्य व वन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. वर्षा चांदेकर तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, प्रा. गणेश किरसान, विनोद चव्हाण उपस्थित होते.
पर्यावरण रक्षणासाठी स्थानिक पातळीवर हातभार लावणे ही अभिमानाची बाब आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सदैव प्रयत्नशील राहून तळमळीने वृक्षसंवर्धनाचे कार्य करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी झाडे आहेत. त्याठिकाणचे तापमान कमी असते. म्हणून वृक्षारोपण बरोबरच वृक्षसंवर्धन करणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन महिला अध्यापक विद्यालयाच्या प्रा. वर्षा चांदेकर यांनी केले. मानव सुंदर व आकर्षक होण्यासाठी विविध प्रकारचे उपाययोजना करीत असतो. त्यात चेहरा व दात मानवाचे विशेष आकर्षक असतात. म्हणून दिवसांतून दोन वेळा दात घासणे आवश्यक आहे. दात व मानसिकतेचा अगदी जवळचा संबंध आहे. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रूपाली राघोर्ते यांनी तर आभार निलिमा काळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रसिका बोपचे, स्वाती आंभोरकर, मनोज टेकाम, वैष्णवी राखे, सिमा पवनकर, साक्षी मेश्राम, प्रतिक्षा मारबते, सानिया मस्के, अस्मिता हुकरे, शुभांगी गाडेकर, रिना सेलोकर, स्नेहा शेंडे, पायल एंचिलवार, ममता उताणे, आरती घोनमोडे, प्राची ढोमणे, सायली मस्के, वैष्णवी गिदमारे, प्रिया सेलोकर, रविना कांबळे, काजल बुजाडे, पल्लवी गभणे, अर्चना नेवारे, श्रृती डहाके, साक्षी धांडे, करिष्मा चोले, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनींनी सहकार्य केले.













