भंडारा दर्पण/प्रतिनिधी
तुमसर : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या दोघांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना तुमसर तालुक्यातील पाथरी येथे गुरुवार (३ एप्रिल) दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. मनिषा भारत पुष्पतोडे (२५) आणि प्रमोद नागपुरे (४५) असे मृतकांची नावे आहेत.
आज सकाळपासूनच विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. सध्या शेतीची कामे सुरु असल्याने शेतमजुर शेतकामात व्यस्त होते. दरम्यान तुमसर तालुक्यातील पाथरी येथे दुपारच्या सुमारास शेतावर काम करीत असताना अचानक वीज कोसळून एका महिलेचा आणि एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.













