भंडारा दर्पण/प्रतिनिधी
भंडारा : मानवाधिकाराचे रक्षण, जतन, संवर्धनासाठी विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना मानवाधिकार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व कलेच्या विविध क्षेत्रातील जनसेवेच्या दखलपात्र आणि अविस्मरणीय कार्य पाहून निवड समितीने या वर्षी चा मानवाधिकार भूषण पुरस्कार 2025 अभय रंगारी यांची निवड केली आहे.
अभय हे कवी, लेखक, समाजसेवक, वक्ता, साहित्यिक, साहित्यकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच मानवाधिकाराचे समर्थक आहेत. लोकांच्या समस्या ते कायदेशीर मार्गाने त्वरित सोडवितात. त्यांना या अगोदर राज्य व राष्ट्रीय पातळीवर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांना मानवाधिकार भूषण 2025 पुरस्कार रविवार दिनांक 06 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2 वाजता अमृता लॉन, घुलेवाडी रोड, पुणे नाशिक हायवे, संगमनेर जिल्हा नगर, महाराष्ट्र राज्य येथे मानवाधिकार फाऊंडेशनच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते वितरित होणार आहे. याबद्दल परिसरातील जनतेने त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.













