भंडारा दर्पण/प्रतिनिधी
लाखनी : लांडग्याने हल्ला करून गाईच्या दोन वासरांना ठार केल्याची घटना घडली. ही घटना लाखनी तालुक्यातील मानेगाव (सडक) येथे सोमवारी (31 मार्च) सकाळी उघडकीस आली. करण तेजराम रोटके असे नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव आहे.रोटके यांनी नेहमीप्रमाणे सायंकाळी गाई व त्यांची दोन वासरे गोठ्यात बांधून ठेवली होती. मध्यरात्री दरम्यान लांडग्याने गोठ्यात शिरून गाईच्या दोन वासरांवर हल्ला चढविला यात वासरे ठार झाली. घटनेची माहिती मिळताच लाखनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. गोखले यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक जे. एम. बघेले, बीटरक्षक कु. टी. जी. गायधने, बीट मदतीस मयूर गायधने यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख यांनी मृत वासरांची पाहणी व चौकशी केली.













