भंडारा दर्पण/प्रतिनिधी
तुमसर : नगर परिषद तुमसर येथे उपजीविका कृती आराखडा समितीची सभा संपन्न झाली. यात दीनदयाल जन आजीविका योजना (शहरी) अंतर्गत शहर उपजीविका कृती आराखडा तयार करण्याकरीता सीएलटिएफ समिती गठीत करण्यात आली.
नगरपालिका प्रशासनाद्वारे शहरातील विविध क्षेत्रातील महिलांना व सुशीक्षीत मुला-मुलींना, दिव्यांग, निराधार वृद्धांना आश्रय देऊन गरिबी निर्मूलन करून कामगार, सफाई कामगाराना शहरात कौसल्ये भिमुख करणे आहे. सभेचे अध्यक्ष तुमसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर मुंडे होते. प्रकल्प अधिकारी यमु नागदिवे यांनी शहरी उपजीविका कृती आराखडा समिती विषयी विशेष मार्गदर्शन केले.
यावेळी सभेत गुलराज कुंदवानी, प्रा. राहुल डोंगरे, अरविंद कारेमोरे, रुंदा गायधने, श्रीकृष्ण देशभ्रतार, ज्योती रमेश कावळे, शिल्पा प्रवीण बनसोडे, भंडारा शासकीय कार्यालयीन प्रतिनिधी व तुमसर नगरपरिषद विभागातील प्रशासकीय प्रतिनिधी उपस्थित होते.
