भंडारा दर्पण/प्रतिनिधी
जवाहरनगर : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन चे बक्षीस वितरण जिल्हा परिषद शाळा दवडीपार (बा.) येथे करण्यात आले. यात भंडारा तालुक्यातील गोपीवाडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. सन्मान चिन्ह व तीन लक्ष रुपये असे पारितोषिकाचे स्वरूप आहे.
याप्रसंगी शाळेचे सहाय्यक शिक्षक विनोद कुंभरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरणारा विद्यार्थी बंटी महेश रघोर्ते याचाही सत्कार करण्यात आला.पुरस्कार वितरण कार्यक्रम भंडारा पंचायत समितीचे सभापती कल्पना कुर्जेकर, उपसभापती नागेश भगत यांच्या हस्ते पार पडला.
प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे सर्व सदस्य, गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी शिल्पा निकाळे, भोयर, केंद्रप्रमुख लता भोयर, सहाय्यक अध्यापक बाबरे पंचायत समिती सदस्य संजय बोंद्रे, सरपंच विनायक टांगले, एमएमपीएल कंपनीचे जनरल मॅनेजर मूर्ती, मुख्याध्यापिका मंगला आदे, सहाय्यक अध्यापिका येलमुले, मेश्राम, बावनकुळे, रामटेके, अध्यापक कुंबरे उपस्थित होते.













