भंडारा दर्पण/प्रतिनिधी
भंडारा: विदर्भ पाठबंधारे विकास महामंडळ नागपूर तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त उपक्रमा अंतर्गत स्व. रामभाऊ उके पाणी वापर संस्थेच्या वतीने सोमनाळा/बू येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत जलसप्ताह कार्यक्रम शुक्रवार दि.२१ मार्च रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.
लोक सहभागातुन पाण्याचे संवर्धन, पाण्याच्या दुरुपयोग कमी करणे, देशातील हंगामाची स्थिती, पाण्याची आवश्यकता, पाण्याच्या काटकसरीने वापर, समोरच्या येणाऱ्या काळातील पाण्याचे संकट याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक एच.पी.घावळे, सहा.शिक्षक वाय.एच.बोरकर, शिक्षण सेवक एम.डी.दौंड, पी.व्ही.शेंगुळे, कल्पना समरित, राजू गिरडकर, शाळा समिती अध्यक्ष रविंद्र जांभूळकर ग्रामपंचायत सदस्य तसेच पाणी वापर संस्थेचे सचिव दिगांबर वंजारी तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे समित हेमने, अश्विन लांजेवार, कार्तिक वंजारी, लक्ष्मीकांत हत्तीमारे उपस्थित होते.
