चांदोरी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
प्रतिनिधी/ भंडारा
जल जीवन मिशन अंतर्गत “हर घर नल, हर घर जल” हि योजना जिल्ह्यात सर्वत्र राबविली जात आहे. या योजने अंतर्गत चांदोरी गट ग्रामपंचायतमध्ये येत असलेल्या शिंगोरी गावात सुद्धा जल जीवन मिशनचे काम मार्च २०२४ मध्ये पूर्ण झाले. मात्र अद्याप गावातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने “गावात नळ अन पाण्यासाठी लळ” अशी व्यथा शिंगोरीवासीयांनी व्यक्त केली आहे.
नागरीकांना पाण्यासाठी भटकावे लागू नये त्यांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे, या उदात्त हेतूने केंद्र शाशनाने जल जीवन मिशन योजना सुरु केली. मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे हि योजना कुचकामी ठरत असल्याचे चित्र सर्वत्र आहे. चांदोरी गट ग्रामपंचायत अंतर्गत मार्च २०२४ येत असलेल्या शिंगोरी गावात सुद्धा जल जीवन मिशनचे काम मार्च २०२४ मध्ये पूर्ण झाले. उन्हाची तीव्रता वाढत आहे. अशातच शिंगोरी वासियांना मुबलक पाणी मिळत नाही. तसेच उन्हाळ्यात दुषित पाणी पूरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न शिंगोरी येथील नागरिकांसमोर उभा आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत शिंगोरी या गावात पाण्याची टाकी तयार झाली, गावात पाइपलाइन टाकण्यात आली, मात्र अनेकांना अद्याप नळ कनेक्शन मिळाले नाही. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. याकडे चांदोरी ग्रामपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत. याकडे संबंधित अधिकारी व विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा शिंगोरी वासियांनी दिला आहे. तसेच
ग्रामपंचायतिला गावातील समस्या सोडविता येत नसतील तर सिंगोरी कोकनागड अशी वेगळी ग्रामपंचायत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
