प्रतिनिधी/लाखनी
बिबट्याने हल्ला करीत सहा शेळ्या ठार केल्याची घटना लाखनी तालुक्यातील सालेभाटा येथे घडली. हि घटना सोमवार १७ मार्च २०२५ रोजी सकाळी ६ वाजे दरम्यान घडली असून प्यारेलाल मोडकू रहांगडाले असे नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव आहे.
पशुपालक रहांगडाले यांनी नेहमीप्रमाणे गोठ्यात शेळ्या बांधून ठेवल्या होत्या. मात्र सकाळी ६ वाजेदरम्यान बिबट्याने हल्ला करून गोठ्यातील सहा शेळ्या ठार केल्या. घटनेची माहिती मिळताच लाखनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. गोखले यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक जे. एम. बघेले, बीटरक्षक कु. टी. जी. गायधने, गडेगावचे बीटरक्षक लखवाल, रामपुरीचे बीटरक्षक बोरकर, मदतीस मयूर गायधने यांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला.
यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख, डॉ. कापगते, सरपंच खुमेश बोपचे, पोलीस पाटील संजय बोपचे, भगत व गावातील नागरिक उपस्थित होते. पशुपालक प्यारेलाल रहांगडाले यांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.
