प्रतिनिधी/भंडारा
कोका (जंगल) केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सर्पेवाडा येथे इको फ्रेंडली होळी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक विलास दिघोरे होते. तर प्रमुख पाहुणे विलास केजरकर, शिक्षक रत्नदीप घोडगे, कु. मिना रामटेके, अंगणवाडी सेविका पौर्णिमा चव्हाण, इंदुताई ढोमणे, अंगणवाडी मदतनीस कु. काजल चव्हाण, शंकर सिरसाम उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात स्वच्छता अभियान राबवून पालापाचोळा गोळा करण्यात आला. पालापाचोळ्याची होळी पेटवून आनंदात सण साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रत्नदीप घोडगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मीना रामटेके यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता दुर्गेश्वरी पंधरे, पुजा कोबडे, स्विनल रामटेके, यश रेहपाडे, लावण्य डोंगरे, नैतिक वरठे, दिपांशु मानकर, सोहम वरकडे, प्राची रोडगे, दिपाली बरडे, समर डोंगरे, श्रावणी मेश्राम, आस्था भालेराव, स्वराली टेटे, आर्यन भालेराव, साक्य डोंगरे, नैतिक वरठे, रेहांश डोंगरे, ओमकार पेंदाम, यश रेहपाडे व विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहकार्य केले.
