प्रतिनिधी/भंडारा
खासदार चंद्रशेखर आझाद व विनयरतन सिंह यांच्या ताफ्यावर मथुरा आणि ओडिसा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भारत एकता मिशन जिल्हा भंडारातर्फे जिल्हाधिकारी यांना सोमवार १० मार्च रोजी निवेदन निवेदन देण्यात आले. खासदार चंद्रशेखर आझाद यांना Z+ सुरक्षा व भाई विनयरतन सिंग यांना पुख्ता सुरक्षा देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर मेश्राम, संपर्कप्रमुख अश्विन गोस्वामी, विक्रांत भालाधरे, अमोल भिवगडे, तालुका अध्यक्ष महेंद्र बनसोड, भीम आर्मी शहर अध्यक्ष मृणाल रंगारी, सनी खंडारे, मोहम्मद शेख, रितिक वासनिक, शुभम लोणारे, सिद्धांत रंगारी, तथागत फुले तिलकराम रामटेके, दीपक बोरकर, प्रशांत रामटेके, मोतीलाल रामटेके, चेतन खांडेकर उपस्थित होते.
