प्रतिनिधी/ भंडारा
विविध क्षेत्रातील जनसेवेच्या कार्याबद्दल दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य तर्फे अभय रंगारी यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार २०२५ जाहीर करण्यात आला आहे. त्यांना हा पुरस्कार रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता राजर्षी शाहू महाराज स्मारक भवन कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारा हा पुरस्कार सामाजिक , शैक्षणिक, राजकीय व कलेच्या विविध क्षेत्रातील जनसेवेचे अविस्मरणीय कार्य पाहून प्रदान करण्यात येतो. निवड समितीने या वर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार 2025 साठी अभय रंगारी यांची निवड केली आहे.
त्यांना या अगोदर राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईतर्फे रंगारी यांना जननायक, लोकगौरव आणि मालवा ट्रस्ट मुंबई तर्फे गोल्डन पिकाक अवार्ड मिळाले आहेत. त्यांच्या यशाबद्दल परिसरातील जनतेने त्यांचे अभिनंदन केले आहे.
