प्रतिनिधी/जवाहरनगर:-
भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माणीत शुक्रवारी २४ जानेवारीला सकाळी १०.३५ वाजता झालेल्या भीषण स्फोटात आठ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले होते.
या पाच जखमींपैकी जयदीप बॅनर्जी या कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे मृतांची संख्या ९ झाली आहे.
आयुध निर्माणीत २४ जानेवारीला झालेल्या भीषण स्फोटात आठ कामगारांचा मृत्यू झाला असून गंभीर जखमी पाच कामगारांना येथील विविध रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. जखमींमध्ये एन. पी. वंजारी (५५ वर्षे), संजय राऊत (५१ वर्ष), राजेश बडवाईक (३३ वर्षे), सुनीलकुमार यादव (२४ वर्षे), जयदीप बॅनर्जी (२२ वर्षे) यांचा समावेश आहे. मात्र शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारीला दुपारी १२.१५ वाजता जयदीप बॅनर्जी यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर उर्वरित चार कामगारांची प्रकृती सुधारल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.
उपचारा दरम्यान पुन्हा एका कामगाराचा मृत्यू झाल्याने
आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांत शोककळा पसरली होती.
तर कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांनी आयुधनिर्माणी तसेच बाजूच्या रुग्णालयासमोर प्रचंड गर्दी केली होती.












