भंडारा दर्पण/ प्रतिनिधी
लाखनी: जागतिक वनदिनानिमित्त शुक्रवार २१ मार्च रोजी वनविभागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल राज्यस्तरीय पदक वितरण सोहळ्यामध्ये लाखनी वनविभागातील वनरक्षक त्रिवेणी घनश्याम गायधने यांना महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सुवर्ण पदक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई येथील सभागृहात करण्यात आले होते.
त्रिवेणी गायधने यांनी वनविभागात अस्वल, बिबट, घोरपड या वन्य प्राण्यांच्या शिकाऱ्यांना जेरबंद केले. तसेच अवैद्य वृक्षतोडी संबंधित आरोपी, अवैद्य लाकडे वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करून वनगुन्हा जारी केला होता. हि संपूर्ण कारवाई त्रिवेणी गायधने यांनी भंडारा वनविभागातील अड्याळ वनपरीक्षेत्राअंतर्गत बिट डोंगरगाव (न्या.) येथे कार्यरत असताना केले होते. याबाबत त्यांना सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले.
