भंडारा दर्पण/प्रतिनिधी
पवनी: गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोंढा येथे जागतिक जलदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डी. बी . पवार होते. तर प्रमुख अतिथी जल संपदा विभागाचे समित हेमने, गोंडवाना विद्यापीठाचे अश्विन लांजेवार, कार्तिक वंजारी, लक्ष्मीकांत हत्तीमारे, दिगांबर वंजारी उपस्थितीत होते.
कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व काय व पाणी वाचवण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे तसेच पर्यावरण संतुलन राखणे, झाडे लावणे, पाण्याचा अपव्य टाळणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. जल ही राष्ट्रीय संपत्ती असून या संपत्तीला सांभाळून ठेवणे हे सर्वांचे कर्तव्य असून पाणी वाचवण्याकरिता प्रयत्न करावे असे आवाहन समित हेमने यांनी केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना जल प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमाच्या संचालन राम भोपे यांनी तर आभार निशांत नेवारे यांनी मानले.













