प्रतिनिधी/सडक/अर्जुनी (गोंदिया)
डुग्गीपार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पांढरी परीसरात मोटारसायकलने गांजा तस्करी करण्याऱ्या तीन तरुणांना डुग्गीपार पोलिसांनी (दि.६) मार्च रोजी अटक केली आहे. दरम्यान, आरोपीतांकडून एकूण १ लाख १५ हजार ३२० हजार रुपये किमतीचा २ किलो ९९९ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. कार्तिक शिवेंद्र कवरे(वय २० वर्ष रा. डुण्डा ता.सडक/ अर्जुनी जि. गोंदिया), आदित्य ब्रम्हानंद धनविजय(वय २२ वर्ष रा. खैरी/दिवान ता. पवनी जि. भंडारा) व विनय खुशाल बारापात्रे(वय २१ वर्ष रा.आंधळगांव ता. मोहाडी जि. भंडारा) अशी आरोपीतांची नावे आहेत.
डूग्गीपार पोलीस अधिकारी, कर्मचारी गस्तीवर असताना या घटनेतील आरोपी तरुण मोटार क्रमांक एम.एच ३६/ऐके ४४३० या मोटारसायकलने संशयीतरीत्या वावरतांना आढळून आले. दरम्यान,त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांच्याकडील असलेल्या बॅगमध्ये तिन पॉकेट गांजा (२ किलो ९९९ ग्रॅम) मिळून आल्याने आरोपीतांकडुन गांजा व मोटारसायकल असा एकुण १ लाख १५ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,आरोपीविरुध्द कलम ८ (क), २०, २९ एन.डी.पी.एस. ऍक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हि कार्यवाही पोलीस अधिक्षक गोंदिया गोरख भामरे,अपर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा,विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंगेश काळे, जगदिश मेश्राम,आशीष अग्नीहोत्री,सुनिल डहाके,रंजित भांडारकर, कटरे,संदिप इंगळे, विशाल खोब्रागडे यांनी केली.या गुन्ह्याचा तपास सपोनि प्रमोद बांबोळे हे करीत असून गुन्हयातील आरोपींची पाच दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.













