प्रतिनिधी/ लाखनी
तालुक्यातील ग्रामपंचायत धानला येथील भूमापन क्रमांक २५१/२ मधील भूखंड क्रमांक १५०,१५१ मध्ये अतिक्रमित जागेवर विनापरवाना पक्के घराचे बांधकाम ग्रामपंचायतीने जेसीबीच्या साहाय्याने हटविले.ही कारवाई गुरवार (दि.२७) फेब्रुवारी रोजी करण्यात आली. गट क्रमांक २५१/२ मधील भूखंड क्रमांक १५० रिक्त असून व १५१ या सरकारी जागेवर पंकेश पडोळे यांनी अतिक्रमण केले होते.काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्या ठिकाणी पक्के घराचे बांधकाम केले.यापूर्वी त्याठिकाणी त्यांचे पाळीव जनावरे राहत असायचे. दरम्यान,याबाबत पडोळे यांना ग्रामपंचायत धानला ने सदर गट क्रमांकावरील अतिक्रमण निष्कासित करण्यासंबंधाने ४ नोटीसही बजावले होते. मात्र, नोटिसांना एकही उत्तर न देता पडोळे यांनी विनपारवाना बांधकाम सुरुच ठेवले.दरम्यान, ग्रामपंचायत धानला ने गुरुवार (दी.२७) फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० वाजता सरपंच वैशाली संजय ठाकरे,उपसरपंच संदेश इलमकर,ग्रामपंचायत सदस्य राहूल राघोर्ते,जयकृष्णा बांडेबुचे, ग्रामपंचायत सदस्या संघमित्रा इलमकर,आशा ईश्वरकर,पोलिस पाटील सतीश गोविंदा राघोर्ते,तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात या भूखंडावरील पक्के बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने पाडले.
गट क्रमांक २५१/२ मधील भूखंड क्रमांक १५०,१५१ या भूखंडावर पंकेश बिसन पडोळे यांनी अतिक्रमन केले असून, विनापरवाना पक्के घराचे बांधकाम केले आहे.पडोळे यांचे अतिक्रमन त्यांच्या पत्नीच्या नावाने भूखंड क्रमांक १९३ वर असून त्यांनी बळजबरीने भूखंड क्रमांक १५०,१५१ वर अतिक्रमन करून पक्के घराचे काम केले. या संदर्भात पंकेश पडोळे यांना ग्रामपंचायतीकडून चार नोटीस दिले असून दि.६ नोव्हेंबर २०२४ रोजी अंतिम चौथे नोटीस देवून अतिक्रमण काढण्याचे सांगितले होते. मात्र,नोटिसांचे प्रतिउत्तर न देता त्यांनी बांधकामं सुरुच ठेवले.मासिक सभा दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी ठराव क्रमांक ९ नुसार महाराष्ट्र ग्रा.पं. अधिनियम कलम ५३ च्या अनुषंगाने दि.२९ नोव्हेंबर २०२४ ला ग्रामपंचायत प्रशासनाव्दारे अतिक्रमण काढण्याबाबद चर्चा करण्यात आली.मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, तमुस अध्यक्ष तसेच सर्व ग्रामपंचायत कमेटी, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीत अतिक्रमण निष्काषित करण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले व दि.२७ फेब्रुवारी रोजी सदर अतिक्रमन निष्काषित करण्यात आले.
वैशाली संजय ठाकरे
सरपंच ग्रामपंचायत धानला
सदर जागेवर अतिक्रमन करून विनापरवाना पक्के घराचे बांधकाम करण्यात आले. त्यांचे अतिक्रमण पत्नीच्या नावाने भूखंड क्र.१९३ मध्ये असून, त्यांनी भूखंड क्र.१५०,१५१ वर अतिक्रमन करून पक्के घराचे बांधकाम केले.याप्रकरणी वेळोवेळी ग्रामपंचायतीकडून बांधकाम थांबवा,याकरिता नोटीस दिले होते.मात्र,प्रतिउत्तर मिळाले नाही. त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियम कलम (५३) नुसार सदर जागेवरील अतिक्रमन निष्काषित करण्यात आले.
संदेश ईलमकर
उपसरपंच ग्रामपंचायत धानला.
मागील ३० वर्षांपासून या जागेवर गायी,म्हशी, जनावरे बांधत आहे.आजपर्यंत एकही सरपंच याठिकाणी आला नाही. याठिकाणी सगळी साफसफाई, देखरेख मी करीत होतो.त्यानंतर मला राहायला जागा नाही म्हणून घराचे बांधकाम केले.मात्र, ग्रामपंचायतीने एकही नोटीस न देता माझे घर पाडले.
पंकेश बिसन पडोळे
अतिक्रमणधारक, ग्रामपंचायत धानला.













