प्रतिनिधी/जवाहरनगर
भंडारा तालुक्यातील सावरी जवाहरनगर येथे शंकर महाराज आश्रमला लागून असलेल्या नालीमध्ये घाण साचली असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून सावरीवासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकाराकडे संबंधित प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.
काही दिवसांपूर्वी शंकर महाराज आश्रमात शिवरात्री पर्वावर भागवत सप्ताह आयोजित करण्यात आले होते. या सप्ताह कार्यक्रमात दर दिवशी नास्था, भोजनाची मेजवानी असल्याने यातील शीळे व वाचलेले अन्न सरळ लागून असलेल्या नालीत टाकल्या गेले. भक्तिमय आनंदात भागवत सप्ताह कार्यक्रमाचे समापन झाले. मात्र वाचलेल्या शीळे अन्नाची विल्हेवाट इतरत्र न करता ते अन्न सरळ नालीत टाकले गेले आहे. त्यामूळे पाण्याचा विसर्ग होत नसल्यामुळे शीळे अन्न व साचलेल्या पाण्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहेत.
या आश्रमातील भवनात लग्न समारंभ व इतर कार्यक्रम होत असतात. यासाठी ठराविक राशी देखील घेतली जाते. परंतु आश्रम कामेटीद्वारे वाचलेल्या अन्नाची विल्हेवाट न लावता ते शिळे अन्न नळीत टाकले जाते. याचा त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागत असून त्यापासून होणाऱ्या दुर्गंधीचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
शंकर महाराज आश्रम भवन येथे होत असलेले कार्यक्रमातून वाचलेले शीळे अन्नाची विल्हेवाट इतरत्र करण्याचे सुचना आश्रम पदाधिकाऱ्यांना पूर्विच दिले गेले होते.मात्र अन्नाची विल्हेवाट इतरत्र न करता सरळ नालीत वाचलेले अन्न टाकले गेल्याचे दिसून येत आहे. त्यातून दुर्गंधी पसरली असल्याने यावर तोडगा काढला जाईल.
गिरीश ठवकर
सरपंच, ग्रामपंचायत सावरी जवाहरनगर













